लातूरला स्वतंत्र विद्यापीठ मंजूर व्हावे मालसाची मागणी

लातूर जिल्हा राज्यातच नव्हे तर देशभरात शैक्षणिक क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. लातूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, औषधनिर्माणशास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाची संख्या (शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य दिनांक १५/०९/२०२० नुसार) ११८ तर लातूर शहरात एकूण महाविद्यालयांची संख्या ४० आहे.
२००७ मध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथील पेठ येथे सुरू करण्यात आले. मात्र प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरुप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थ्यांना आजही परीक्षा फॉर्म, पदवी फॉर्म, पदवी प्रमाणपत्र तसेच अन्य कागदपत्रे ने आण करण्यासाठी, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी व इतर अनेक छोट्या मोठ्या कारणास्तव लातूर वरून नांदेड पर्यंत प्रवास करावा लागतो. तिथंही वेळेत काम पूर्ण होत नाहीत, विद्यार्थ्यांची पूर्णपणे गैरसोय होत असते. लातूर पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षणासाठी येत आहेत. परंतु आजही लातूरला स्वतःचे हक्काचे विद्यापीठ नाहीये, ज्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तरचे चांगले शिक्षण मिळत नाही. त्यासाठी
“आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने” स्वतंत्र विद्यापीठ मागणीसाठी आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशनने जाहीर पाठिंब्याचे निवेदन देते वेळी उपोषण मुख्यसंयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, बालाजीअप्पा पिंपळे, ताहेरभाई सौदागर, अजयसिंग राठोड, संगमेश्वर पानगावे, अतिश नवगिरे आदी मान्यवर होते. यावेळी उपस्थित मालसाचे महाराष्ट्र राज्याचे सह-सचिव दिपक घटकार सर, मालसा सीईटी सेल हेल्पलाईन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी दत्तात्रय येरमुळे सर, सहकारी दिपक कदमापुरे सर आदी उपस्थित होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these