महाविधी लॉ स्टूडेंटस् असोसिएशन चे मराठवाडा सचिव फारूखी लुखमान यांनी व बीड जिल्हासचिव सद्दाम शेख यांनी आज बीड येथे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे हफ्ते वेळेत मिळत नसल्याबाबत देखील त्यांनी चर्चा केली. सरकारने तात्काळ याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या विविध असलेल्या अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी विधीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.