विधी अभ्यासक्रमाचे पेपर पुढे ढकलण्यात यावेत या मागणीसाठी नांदेड विद्यापीठात मालसा तर्फे निवेदन देण्यात आले

दि. 11/12/2023 रोजी महाविधी लॉ स्टुडंट्स अससोसिएशन तर्फ 15/12/2023 रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात निवेदन देण्यात आले. कारण डिसेंबर महिन्यामध्ये – MPSC आयोग, UGC NET, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग तसेच वनविभागाच्या इत्यादी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण परिक्षा आहेत. आपल्या विद्यापीठाच्या सत्र परीक्षा याच दिवशी असल्यामुळे खूप विध्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कोणत्याही वि‌द्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन विद्यापीठाच्या 15 डिसेंबर पासून होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात माननीय डॉ. दिगंबर नेटके सर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरांशी सकारात्मक चर्चा झाली विद्यार्थी हीत लक्ष घेऊन निर्णय लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले. यावेळी मालसा नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष अश्विन तेहरा सर,S. P. विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवमूर्ती राठोड सर, संकेत बंडेवार सर,सुशांत चोले सर,वाठोरे लक्ष्मण सर व इतर होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these