नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो आपण महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (मालसा) ची स्थापना विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी केली आहे. आणि आपल्याला सांगण्यात आनंद वाटतो की संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मालसाची वाटचाल सुरू आहे "विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ" म्हणजे मालसा. मागील तीन वर्षांपासून आपण मालसा मार्फत हजारो विधीचे विद्यार्थी एका छताखाली येऊन विधायक काम करत आहोत याचा मला संस्थापक अध्यक्ष म्हणून मनस्वी आनंद वाटतो. यापुढेही आपण असेच सोबत काम करत राहू आणि "मालसा" विधीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू या सदिच्छा. धन्यवाद.